बारामती दर्पण प्रतिनिधी:
बारामती तालुक्यातील कृषि उद्योग मूल शिक्षण संस्थेच्या वसतिगृह विद्यालय,का-हाटी येथील विद्यार्थिनी कु.प्रियंका हरी वाबळे हिची तायक्वांदो(16 किलो खालील वजनी गट) या खेळ प्रकारांमध्ये राष्ट्रीय पातळीवर निवड झालेली आहे .दिनांक 22 डिसेंबर रोजी लातूर या ठिकाणी झालेल्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेमध्ये तिने प्रथम क्रमांक मिळवला. तसेच मध्यप्रदेश येथे होणाऱ्या 67 व्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी तिची निवड झाली असून या स्पर्धा दिनांक 28/12/2023 ते 05/01/2024 दरम्यान पार पडणार आहेत. कु.प्रियंकाच्या निवडीबद्दल तिचे कृषि उद्योग मूल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री.अजितदादा पवार साहेब तसेच संस्थेच्या संचालिका मा.सौ.सुनेत्रावाहिनीसाहेब पवार ,उपाध्यक्ष मा. श्री.दशरथदादा धुमाळ साहेब ,सचिव मा. श्री.प्रफुल्ल तावरे साहेब, खजिनदार मा. श्री.सुभाष सोमाणी साहेब व संस्थेचे सर्व संचालक,संस्थेचे कार्यकारी अधिकारी,विद्यालयाच्या प्राचार्या, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व सर्व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. कु. प्रियांका ला विद्यालयाचे क्रीडाशिक्षक श्री.अल्लाबक्ष शेख व श्री.नटवर शिंदे यांनी मार्गदर्शन केले.
Post a Comment