बारामती दर्पण प्रतिनिधी 
 बारामती :
 बहुजन समाज पार्टीच्या बारामती विधानसभा उपाध्यक्षपदी विशाल घोरपडे यांची एकमताने निवड करण्यात आली. बारामती येथे मंगळवार दिनांक 16 जून रोजी बहुजन समाज पार्टीच्या नवीन कार्यकारणीची निवड बहुजन समाज पार्टीचे प्रदेश महासचिव काळुराम चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. विशाल घोरपडे हे गेली 14 वर्ष काळूराम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली एकनिष्ठपणे पक्षाचे काम करत आहेत. विशाल घोरपडे यांच्या निवडीने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.निवडीनंतर विशाल घोरपडे म्हणाले की, पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्यांची कामे मार्गी लावणार असून पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवून अधिक गतीने काम करून पक्षाची ताकद वाढवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post