बारामती दर्पण प्रतिनिधी:
काऱ्हाटी:

बारामती तालुक्यातील काऱ्हाटी येथील कृषी उदयोग मुल शिक्षण संस्थेच्या गुरुकुल इंग्लिश मेडियम स्कुलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. सालाबाद प्रमाणे विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळण्यासाठी सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. 
कार्यक्रमाचे दिप प्रज्वलन प्रमुख पाहुणे मा.श्री रणजीत ताम्हाणे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात संस्थेचे संचालक मा.श्री दत्तात्रय वाबळे,प्रशासकीय अधिकारी मा.श्री विकास निर्मल,प्राथमिक शाळेच्या मुखाध्यापिका मा.सौ.कमल रसाळ,माता पालक संघाच्या प्रमुख मा.सौ.सुजाता बोरावके आदि उपस्थित होते. यावर्षीच्या स्नेह संमेलनात ३४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी शेतकरी नृत्य,गोंधळी नृत्य,नाटिका अशा विविध कलागुणांची उधळण केली. गुढीपाडव्या पासून सुरु होणाऱ्या नववर्षापासून सर्व सणांचे नृत्य प्रदर्शन करत भारतीय संस्कृती  दाखवण्यातआली.Women Empowerment,Child Save girl,Friendship,Mobile Addiction  अशा विविध मुद्यावर प्रकाश टाकणारे नृत्य अगदी सहज आपल्या विद्यार्थांनी सादर केले. सध्याच्या युगात महत्त्वाचे असे शारीरिक सुदृढतेचे महत्व आपल्याला कराटे मधून करण्यात आले. असे विविधतेतून एकतेचे महत्व सांगत कार्यक्रम उत्साहात पार पडला.कार्यक्रमास परीक्षक म्हणून मा.श्री अक्षय तावरे व मा. श्री चंद्रसेन कोकणे यांनी काम पहिले.सूत्रसंचालन शिक्षिका सौ.लिना जराड आणि सौ.रुपाली पिसाळ यांनी केले. अशी माहिती गुरुकुल इंग्लिश मेडीअम स्कुलच्या प्राचार्या सौ.सुप्रिया आहेरकर यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post