बारामती दर्पण प्रतिनिधी: (दि:१६):
बारामती तालुक्यातील कृषि उद्योग मूल शिक्षण संस्थेच्या गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल,का-हाटी येथील  विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत घवघवीत यश मिळवले आहे. कु. मानवी खोमणे(इयत्ता सातवी) , कु. समीक्षा खोमणे (इयत्ता आठवी ), कु. सिद्धी खोमणे (इयत्ता सहावी), कु. अंकिता जगताप (इयत्ता सहावी), कु. पूर्वी धोत्रे (इयत्ता सातवी), कुमार स्वप्निल जाधव (इयत्ता दहावी)या विद्यार्थ्यांनी वार -रविवार दिनांक 14/01/2024 रोजी पुणे येथे पार पडलेल्या जिल्हा व युवक सेवा संचालक ,महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय योग मंडळ  मार्शल आर्ट या स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल मिळविले तसेच या विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. सर्व विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री.अजितदादा पवार साहेब तसेच संस्थेच्या विश्वस्त मा.सौ.सुनेत्रावहिनीसाहेब पवार ,उपाध्यक्ष मा. श्री.दशरथदादा धुमाळ साहेब ,सचिव मा. श्री.प्रफुल्ल तावरे साहेब, खजिनदार मा. श्री.सुभाष सोमाणी साहेब व संस्थेचे सर्व विश्वस्त ,संस्थेचे कार्यकारी अधिकारी,स्कूल प्राचार्या, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व सर्व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. या विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन स्कूल च्या क्रीडा शिक्षिका सौ. स्वाती भापकर यांनी केले, अशी माहिती प्राचार्या सौ.सुप्रिया आहेरकर यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post