बारामती दर्पण प्रतिनिधी
वडगाव निंबाळकर:
मोरगाव येथील पत्रकार विनोद पवार यांच्यावर खुनी हल्ला करणाऱ्या मुख्य आरोपी मंगेश जगताप याला न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कस्टडी व रिमांड मंजूर केले आहे. शनिवार दिनांक ४रोजी तरडोली येथे जमिनीच्या वादातून मंगेश जगताप व इतर चार ते पाच साथीदारांनी पत्रकार विनोद पवार यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. या संदर्भात वडगाव निंबाळकर पोलिसांनी ३०७ सह अन्य कलमानुसार आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. यानंतर बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघाने ही बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे व वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांना निवेदन देत आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली होती. यातील मुख्य आरोपी मंगेश जगताप याला पोलिसांनी दुसऱ्या दिवशी अटक केली तर इतर आरोपी अजूनही फरार आहेत. मंगेश जगताप याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १० तारखेपर्यंत आरोपीला पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे. तसेच इतरही आरोपी लवकरच पकडले जातील अशी माहिती तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख यांनी दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post