बारामती दर्पण प्रतिनिधी
कोऱ्हाळे बुद्रुक:
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, राष्ट्रीय सेवा योजना ,शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे कॉलेज ऑफ कॉमर्स ,सायन्स अँड कम्प्युटर एज्युकेशन माळेगाव बुद्रुक तालुका- बारामती जिल्हा- पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने , "विशेष हिवाळी श्रमदान शिबिर"  या उपक्रमांतर्गत मंगळवार दिनांक 31 जानेवारी 2023 ते 6 फेब्रुवारी 2023 या कालावधीत हे शिबिर मौजे थोपटेवाडी (सावंत वस्ती) तालुका -बारामती जिल्हा - पुणे येथे संपन्न झाले.  निरोप समारंभाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे दैनिक सकाळचे पत्रकार श्री .कल्याणराव पाचांगणे हे उपस्थित होते, त्यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन  करताना सांगितले की इच्छाशक्तीच्या जोरावर काम केले तर हाती घेतलेले काम निश्चितपणे पूर्ण होईल तसेच गावच्या विकास प्रक्रियेसाठी स्वयंसेवकांना  मार्गदर्शन केले.
प्राचार्य डॉ.अजित चांदगुडे सर यांनी सामाजिक जाणीवतेचा बदल स्वयंसेवकांमध्ये कसा झाला पाहिजे याबद्दल मार्गदर्शन केले .तसेच कार्यक्रम अधिकारी प्रा. आशिष भगत सर आणि विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.या शिबिरादरम्यान जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा परिसर स्वच्छ करून शाळेच्या भिंतींना कलर देऊन चित्र काढणे, मंदिर परिसर स्वच्छ करणे, स्मशानभूमी स्वच्छता ,वृक्षारोपण करणे ,विविध क्षेत्रातील अनुभवी व्याख्यातांची व्याख्याने आयोजित करण्यात आली.
स्वयंसेवकांनी केलेल्या कामाचे कौतुक समस्त ग्रामस्थांनी केले ,हे शिबिर संपन्न करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजित चांदगुडे कार्यक्रम अधिकारी प्रा. भगत आशिष , प्रा . कदम प्रशांत ,प्रा. बंडगर सोनाली, प्रा. तावरे प्रमोद ,प्रा. जाधव चंद्रकांत, प्रा. कांबळे सोनल, प्रा . केवटे पूनम व प्रा .धुमाळ शितल यांनी विशेष परिश्रम घेतले.
 या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य सचिन वाघ ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक माळशिकारे सर, काळभोर सर, कॉलेजचे प्राचार्य डॉ . अजित चांदगुडे, कार्यक्रम अधिकारी प्रा .आशीष भगत , प्रा. सचिन सस्ते, प्रा . मंगेश फुटाणे यावेळी उपस्थित होते.
 या शिबिरासाठी शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष मा. श्री.बाळासाहेब तावरे, विश्वस्त श्री. वसंतराव तावरे ,श्री .अनिल जगताप, श्री. महेंद्र तावरे, श्री .रामदास आटोळे ,श्री. रविंद्र थोरात, श्री. गणपत देवकाते ,सौ. सीमा जाधव ,सौ. चैत्राली गावडे आणि संस्थेचे सचिव श्री प्रमोद शिंदे तसेच थोपटेवाडी गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील आणि ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले.

Post a Comment

Previous Post Next Post