बारामती दर्पण प्रतिनिधी दि:१६
थोपटेवाडी गावचे ज्येष्ठ मार्गदर्शक जनार्दन (दादा) बाजीराव थोपटे(वय७४) यांचे आज दुपारी दुःखद निधन झाले. त्यांच्यावर पुणे येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. थोपटे यांच्या पाठीमागे पत्नी, तीन मुले असा परिवार असून जनार्दन (दादा) थोपटे यांनी कोराळे बुद्रुक चे उपसरपंच पद भूषवले होते. त्यांच्या निधनाची बातमी गावात कळताच अनेकांनी दुःख भावना व्यक्त केल्या आहेत. आज शुक्रवार दिनांक १६ रोजी रात्री ८ वाजता थोपटेवाडी येथील  राहत्या घराशेजारी शेतामध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post