बारामती दर्पण प्रतिनिधी
सोमेश्वर नगर (दि:१७)
सोमेश्वर नगर येथे बॅटरीचे दुकान फोडून चोरी करणाऱ्या चोरट्यांना वडगाव निंबाळकर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हददीतील करंजेपुल गावचे हददीत करजेपुल ते सोमेश्वर मंदिर रोडलगत पत्र्याचे गाळेमध्ये येथे दि. १५ रोजी रात्री फिर्यादीचे सोमश्वर अटो इलेक्टिक बॅटरीचे दुकानचे दरवाजाचे कडी कोयंडा तोडुन दुकानातून १,५२,३२८/- रूपये किंमतीच्या वेगवेगळया कंपनीच्या इलेक्ट्रिक बॅटन्या अज्ञात चोरटयाने चोरी केल्या होत्या. सदर बाबत बड़गाव निंबाळकर पोलीस स्टेशन गु.र.नं. ३२७ / २०२२ भादवि ४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयातील मुददेमाल हा हातगाडीवर भरून चोरटे दुकानपासून दूर अंतरावर घेऊन अज्ञात वाहनातून घेऊन गेले होते. सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे शोध घेत सदर गुन्हयातील आरोपी व मुद्देमाल हे बोलेरो पिकअप वाहनातून घेऊन गेले असलेचे निष्पन्न झाले. सदर गुन्हयाचा शोध हा सी सी टी व्ही फुटेज व गोपणीय माहीतीच्या आधारे माहीती घेत मिळाली की कोराळे बु।। येथील एका वस्तीवरील घराजवळ बोलेरो पीक अप वाहन व संशईत आरोपी असल्याची खात्रीशिर माहीती मिळाली सदर ठिकाणी जाऊन संशईत आरोपी नसरूददीन हिरामन भोसले याला ताब्यात घेऊन त्याचेकडे कसून चौकशी केली असता त्याने त्याचे इतर साथीदारांसोबत सदर चा गुन्हा केले असल्याचे कबुल केले. सदर गुन्हयाचे कामी १) नसरूददीन हिरामन भोसले वय २० वर्षे रा पानगेवस्ती कोन्हाळे बु।। ता बारामती २) संतोष आसाराम माळी रा पानगेवस्ती कोन्हाळे बु।। ता बारामती व चोरीचा माल घेणारे (३)सुनिल लाला निंबाळकर रा लासुर्णे ता इंदापुर जि पुणे ४) प्रितम शांतीलाल गांधी रा लासुर्णे ता इंदापूर जि पुणे यांना गुन्हयाचे कामी अटक करण्यात आली आहे. त्यांचे कडुन सदर गुन्हयात चोरी गेलेला मुददेमाल जप्त करण्यात आला असुन गुन्हयात वापरलेले पिकअप वाहन जप्त करण्यात आली आहे. सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक मा. डॉ. अभिनव देशमुख सो पुणे ग्रामीण पोलीस, अपर पोलीस अधिक्षक मिलींद मोहिते सो. बारामती विभाग बारामती, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गणेश इंगळे सो बारामती उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन चे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक श्री सोमनाथ लांडे, पोसई योगेश शेलार, पोहवा अनिल खेडकर, पोहवा महेंद्र फणसे, पोना अमोल भोसले, पोना सागर देशमाने, पोना हृदयनाथ देवकर, पोना. कुंडलिक कडवळे, पोना भाउसाहेब मारकड, पौना सागर चौधरी, पोशि महादेव साळुखे, पोशि पोपट नाळे, पोशि अमोल भुजबळ यांनी केली. पुढील अधिक तपास पोलीस
उपनिरीक्षक योगेश शेलार हे करीत आहेत.
Post a Comment