बारामती दर्पण प्रतिनिधी
पुणे :
 जिल्ह्यातील हडपसरमध्ये दोघा मैत्रिणींनी आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली आहे. हडपसर पोलिस (Hadapsar Police) स्थानकाच्या हद्दीत ही घडना घडली. मंगळवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. यापैकी एका मैत्रिणीनं गळफास लावून आपलं आयुष्य संपवलं तर दुसऱ्या मैत्रिणीने थेट पाचव्या मजल्यावरुनच उडी टाकली.
हडपसर जवळील शेवाळवाडी इथं दोन मैत्रिणीनी आत्महत्या केली. मंगळवारी संध्याकाळी ही धक्कादायक घटना उघडकीस आल्यानं सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली. आत्महत्या केलेल्या दोन्ही मैत्रिणींचं वय अवघं 19 वर्ष असल्याची माहिती समोर आली आहे. यातील एका मैत्रिणीचं नाव आकांक्षा औदुंबर गायकवाड आहे. तर दुसऱ्या मैत्रिणीचं नाव सानिका हरिश्चंद्र भागवत आहे.
सानिका भागवत हीने गळफास लावून आत्महत्या केली. तर आकांक्षाने इमारतीच्या पाचव्या मजल्यावर उडी टाकली आणि जीव दिला. सानिका हीने राहत्या घरातच गळफास लावून घेतल्यानं तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्काच बसला.
पाचव्या मजल्यावरुन उडी टाकल्यामुळे आकांक्षा हीचा जागीच मृत्यू झाला. आकांक्षाने पाचव्या मजल्यावरुन जेव्हा उडी टाकली, तेव्हा ती वरुन थेट एका रुग्णवाहिकेच्या जवळच कोसळली. पाचव्या मजल्यावरुन कोसळल्यामुळे आकांक्षाला मोठ्या प्रमाणात गंभीर जखम होऊन ती रक्तबंबाळ झाली होती.

Post a Comment

Previous Post Next Post