मोरगाव (प्रतिनिधी):
खंडुखैरेवाडी ता . बारामती येथील राजे प्रतीष्ठाण संचलीत न्यू इंग्लिश स्कुल व मयुरेश्वर औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या वतीने रक्तदान व नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते . जागतिक अपंग दिनाच्या निमित्ताने या विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहीती संस्थेचे अध्यक्ष दिलीप खैरे यांनी दिली .
कोरोना या विषाणूजन्य आजारामुळे सर्वत्र रक्ताचा तुटवडा भासत आहे . यामुळे राजे प्रतीष्ठानने भव्य रक्तदान , नेत्र व आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन केले होते . या शिबीराचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समीतीचे माजी सभापती दिलीप खैरे यांनी केले . यावेळी संस्थेच्या सचीव मनिषा खैरे , आय टी आय चे प्राचार्य उद्धव वाबळे , विश्वराज हॉस्पिटल तर्पण ब्लड बँक लोणी काळभोर याचे प्रतिनिधी प्रवीण नवले , सुरेश शितोळे तसेच रक्त दाते प्रभाकर भोंडवे , शशिकांत खैरे , शुभम चांदगुडे आदी उपस्थित होते .
या शिबीरासाठी लोणी काळ्भोर येथिल विश्वराज हॉस्पिटलच्या वतीने तर्पण ब्लड बैंकेने रक्त बॉटलचे संकलन केले . मोरगाव , सुपे , चांदगुडेवाडी , खंडु खैरेवाडी , आदी परीसरातील तरुण वर्ग व विशेषतः महीलांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान केले . तसेच शिबीराच्या निमित्ताने नेत्र तपासणी केल्यानंतर उपस्थित रुग्णांना मोफत चश्मे वाटप करण्यात आले
Post a Comment