सोमेश्वर नगर (प्रतिनिधी);
बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने यंदाची ऊस बिलाची कोंडी फोडली आहे. चालू हंगामात येणाऱ्या उसाला प्रति टन 2867 रुपये एकरकमी एफआरपी जाहीर केली आहे.तसेच15 नोव्हेंबर अखेर तुटलेल्या उसाची संपूर्ण रक्कम 10 डिसेंबरपर्यंत खात्यात वर्ग होणार आहे. एफ आर पी चे पैसे एक रकमी मिळणार का तुकडे पाडून मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
आज कारखान्याच्या जिजाऊ सभागृहात संचालक मंडळाच्या झालेल्या सभेत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप उपाध्यक्ष आनंद कुमार होळकर, संचालक सुनील भगत ,ऋषिकेश गायकवाड, यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते. यावेळी बोलताना अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप म्हणाले की पैशाची उपलब्धता होताच एक रकमी 2867 रुपये सभासदांच्या खात्यावर जमा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post