मोरगाव (प्रतिनिधी):
  खंडुखैरेवाडी ता . बारामती येथील  राजे प्रतीष्ठाण संचलीत न्यू इंग्लिश स्कुल व मयुरेश्वर औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या वतीने रक्तदान व  नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते . जागतिक अपंग दिनाच्या निमित्ताने या विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहीती संस्थेचे अध्यक्ष दिलीप खैरे  यांनी दिली .
कोरोना या विषाणूजन्य आजारामुळे सर्वत्र रक्ताचा तुटवडा भासत आहे . यामुळे  राजे प्रतीष्ठानने  भव्य रक्तदान , नेत्र  व आरोग्य  तपासणी शिबीराचे  आयोजन केले होते  .  या शिबीराचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समीतीचे माजी सभापती  दिलीप खैरे यांनी केले . यावेळी  संस्थेच्या सचीव मनिषा खैरे , आय टी आय चे प्राचार्य उद्धव वाबळे ,  विश्वराज हॉस्पिटल तर्पण ब्लड बँक लोणी काळभोर याचे प्रतिनिधी प्रवीण नवले , सुरेश शितोळे  तसेच   रक्त दाते प्रभाकर भोंडवे , शशिकांत खैरे , शुभम चांदगुडे  आदी  उपस्थित  होते .
या शिबीरासाठी  लोणी काळ्भोर येथिल विश्वराज हॉस्पिटलच्या वतीने   तर्पण ब्लड बैंकेने रक्त बॉटलचे   संकलन केले . मोरगाव , सुपे , चांदगुडेवाडी , खंडु खैरेवाडी , आदी परीसरातील तरुण वर्ग व विशेषतः महीलांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान  केले  . तसेच  शिबीराच्या निमित्ताने  नेत्र तपासणी केल्यानंतर उपस्थित रुग्णांना मोफत चश्मे वाटप करण्यात आले

Post a Comment

أحدث أقدم