बारामती दर्पण प्रतिनिधी:
वडगाव निंबाळकर:
पत्रकारांच्या विरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्या व मारहाणीची धमकी देणाऱ्या खासदार संजय दिना पाटील यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी बारामती तालुक्यातील पत्रकारांनी केली आहे.
बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघ व बारामती तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जीवन मोहिते यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले. यावेळी बोलताना पत्रकार म्हणाले की लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारणे हा त्यांचा हक्क असून अशा प्रकारची मुस्कटदाबी सहन केली जाणार नाही. खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा.
पत्रकारांविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याने पत्रकारांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली असून, अशा प्रकारची विधाने लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा अवमान करणारी असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे
यावेळी बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष युवराज खोमणे, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे अध्यक्ष महेश जगताप, कायदेशीर सल्लागार ॲड गणेश आळंदीकर, कार्याध्यक्ष राजेश वाघ तसेच पुणे जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष चिंतामणी शिरसागर, वरिष्ठ सल्लागार हेमंत गडकरी, सदस्य संतोष शेंडकर, सचिन वाघ, सुशीलकुमार अडागळे, विजय हिरवे उपस्थित होते.
إرسال تعليق