बारामती दर्पण प्रतिनिधी
कोऱ्हाळे बुद्रुक :
बारामती तालुक्यातील को-हाळे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी हनुमंत साहेबराव जगदाळे यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली.
सरपंच पदाचा ठरलेला कार्यकाळ पूर्ण झाल्याने सरपंच रवींद्र (बापू )खोमणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. रिक्त झालेल्या सरपंच पदाच्या जागेसाठी आज गुरुवार दिनांक 20 रोजी ग्रामपंचायत कार्यालयात मीटिंग आयोजित करण्यात आली होती. या पदासाठी हनुमंत जगदाळे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची सरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी मावळते सरपंच रवींद्र (बापू )खोमणे, ग्रामपंचायत सदस्य अनिल शिंदे, लता गजानन नलवडे, राजेंद्र पवार, आबा पडळकर, दिव्याभारती खोमणे,आशाबी सय्यद, मोहन भगत, लालासाहेब माळ शिकारे, शेखर अण्णा खंडागळे, प्रताप (काका) धापटे यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वडगाव निंबाळकर चे मंडल अधिकारी गजानन पारवे, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी कामकाज पाहिले. निवडीनंतर गुलालाची उदळण करत विजय मिरवणूक काढण्यात आली.
Post a Comment