बारामती दर्पण 
कोऱ्हाळे बुद्रुक - हेमंत गडकरी
कोऱ्हाळे बुद्रुक येथील मुस्लिम समाजातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते शौकत मोहम्मद शेख यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने पुण्यात निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते.
     उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ते निकटवर्तीय होते. गेल्या अनेक वर्षांपासून ते सामाजिक क्षेत्रात काम करत होते. पुण्यातील हडपसर भागात गेली अनेक वर्षे त्यांचे वास्तव्य होते. गावातून पुण्यात येणाऱ्या तरुणांना ते नेहमीच मदत करत. पुण्यातील सर्वच राजकीय पक्षात त्यांचे चांगले संबंध होते. मनमिळावू स्वभावामुळे सर्वच जाती धर्मात त्यांचा मोठा मित्र परिवार होता. त्यांच्या पश्चात त्यांची आई,पत्नी, मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post