बारामती दर्पण प्रतिनिधी 
वडगाव निंबाळकर: 
ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट टस्ट्र संचलित कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, बारामती येथील कृषीकन्यांनी 'ग्रामीण कृषी कार्यानुभव' कार्य‌क्रमांतर्गत सदोबाचीवाडी येथील अंगणवाडी परिसरात वृक्षारोपण केले. यावेळी सदोबाचीवाडी गावचे ग्रामस्थ विलास कारंडे, हनुमंत कारंडे, निखिल आगम, ग्रामपंचायत कर्मचारी इकबाल शेख, शाळेचे शिक्षक, अंगणवाडी सेविका सौ. भिसे, आणि शालेय विद्‌यार्थी यांनी कृषीकन्यांसमवेत वृक्षारोपन केले. पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण ही एक महत्त्वकांक्षी मोहिम कृषीकन्यांनी हाती घेतली आहे. वृक्षारोपन ही मानवी जीवन आणि निसर्ग परस्परावलंबाचे प्रतिक आहे. जे आपल्या भविष्या‌साठी एक समृद्ध पर्यावरण निर्माण करण्यास मदत करेल. या वृक्षारोपणामध्ये कृषीकन्या ऐश्वर्या पोळ, साक्षी जगताप, दिप्ती खैरे, नेहा शिर्के, प्राप्ती बोधले, प्रणिता कर्णे यांनी कार्यक्रमाचे आयोजन करून यशस्वीरित्या कार्यक्रम पार पाडला. ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन श्री राजेंद्र पवार , मुख्य कार्यकारी अधिकारी श्री निलेश नलावडे, प्राचार्या प्रा. जया तिवारी, कार्यक्रम समन्वयक प्रा. नीलकंठ जंजिरे, कार्यक्रम अधिकारी डॉ. मयूर पिसाळ, डॉ .पल्लवी देवकाते, प्रा.शिवानी देसाई, प्रा.अभिषेक गाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post