बारामती दर्पण प्रतिनिधी
कोऱ्हाळे बुद्रुक:
संत सोपानकाका महाराज पालखी सोहळा  कोऱ्हाळे बुद्रुक जवळील कठीण पूल येथील विसावा आटोपून मार्गस्थ होताच संत निरंकारी मंडळाच्या वतीने परिसरात स्वच्छता करण्यात आली.
कोऱ्हाळे येथील मुक्काम आटोपल्यानंतर संत सोपानकाका महाराजांच्या पालखीचा कठीणपूल येथे पहिला विसावा असतो. या ठिकाणी थोपटेवाडी, सावंतवस्ती, बजरंगवाडी, लाटे, माळवाडी, कुरणेवाडी आदी परिसरातून भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे मोठी गर्दी होते. या सोपानकाका महाराज पालखी मार्गस्थ होताच निरंकारी मंडळाकडून स्वच्छता करण्यात आली. परिसराला दोन तासांसाठी यात्रेचे स्वरूप येते..
पालखी मार्गस्थ झाल्यानंतर येथे पाण्याच्या बाटल्यांसह अन्य कचरा मोठ्या प्रमाणात होतो. संत निरंकारी मंडळ बारामती व मोरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कठीण पूल येथे स्वच्छता
अभियान राबविण्यात आले. निरंकारी मंडळाच्या सातारा झोनचे प्रमुख नंदकुमार झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाच्या सदस्यांनी त्यात सहभाग घेतला. या प्रसंगी पणदरे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजदीप राजगे,
आरोग्य सहायक झगडे, सुधीर यादव, शिवाजी टाकले (मोरगाव युनिट सेवादल शिक्षक)मोहन नवले, रोहन जाधव, नामदेव माळशिकारे आदींची उपस्थिती होती. सावंतवस्ती सत्संग मंडळातर्फे या वेळी वारकऱ्यांना न्याहारीसाठी पिठलं-भाकरीची व्यवस्था करण्यात आली होती.

Post a Comment

Previous Post Next Post