बारामती दर्पण प्रतिनिधी 
बारामती:
आंतरराष्ट्रीय योगा दिनाचे औचित्य साधून बारामती हायटेक टेक्सटाईल पार्क लि. अंतर्गत पेपरमिंट कंपनीमध्ये आदरणीय सौ. सुनेत्रावहिनी अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली  योगसाधना उत्साहात करण्यात आली.
यावेळी 500 पेक्षा अधिक कर्मचारी यामध्ये सहभागी झाले होते. यावेळी कंपनीचे डायरेक्टर
आदरणीय  संतोष कटारिया सर,
सौ. सुचिता कटारिया (भाभी), आशिष कटारिया सर, महेश कटारिया, सुरेशभंडारी, उपस्थित यावेळी श्रीमद राजचंद्र मिशन, धर्मपुर गुजरात यांच्याकडून बनवून घेतलेल्या स्कूल बॅग व कर्मचाऱ्यांच्या मुलांना लागणारे शालेय साहित्य याचे वाटप करण्यात आले. यावेळी योग महाविद्यालयाचे
योगगुरु श्री.डॉ.निलेश महाजन, सौ.महाजन मॅडम,
नीलिमा ताई झारगड, सोनाली ठवरे, प्रीती शिंदे, स्वाती घुले,अण्णा ढमे सर ,अनिल वाघ सर, उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पेपरमिंट कंपनीचे व्यवस्थापक श्री. शरद शिंगाडे आणि त्यांच्या टीमने विशेष मेहनत घेतली.

Post a Comment

Previous Post Next Post