बारामती दर्पण प्रतिनिधी:
सांगवी:
 बारामती तालुक्यातील सांगवी येथे बुधवारी (दि. १२) सकाळी चुलत भावानेच शेतात गेलेल्या चुलत भावाचा दगडाने ठेवून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. माळेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी घटनेच्या ठिकाणी दाखल झाले असून घटनेचा पंचनामा करून आरोपीला अटक केली आहे.या घटनेत विनोद हिराचंद फडतरे (वय ३०) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. विनोद फडतरे हा युवक सकाळी जुना सांगवी पणदरे रस्त्यावरील शेतात आपली दुचाकी (एमएच ४२ एक्स ६२९५) वरुन गेला होता. त्या ठिकाणी चुलत भाऊ विशाल फडतरे याने जमिनीच्या वादातून विनोद याची दुचाकी पाडून डोक्यात दगड घालून त्याचा खून केला. लागलीच या घटनेबाबत माळेगाव पोलिसांना माहिती देण्यात आली होती. माळेगाव पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

Post a Comment

أحدث أقدم