बारामती दर्पण प्रतिनिधी:
सांगवी:
 बारामती तालुक्यातील सांगवी येथे बुधवारी (दि. १२) सकाळी अज्ञाताने युवकाचा दगडाने ठेवून खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. माळेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी घटनेच्या ठिकाणी दाखल झाले असून घटनेचा पंचनामा करून पोलिसांनी तपासा करण्यास सुरुवात केली आहे.या घटनेत विनोद हिराचंद फडतरे (वय ३०) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. विनोद फडतरे हा युवक सकाळी जुना सांगवी पणदरे रस्त्यावरील शेतात आपली दुचाकी (एमएच ४२ एक्स ६२९५) वरुन गेला होता. त्या ठिकाणी एका अज्ञात व्यक्तीने दुचाकी पाडून डोक्यात दगड घालून त्याचा खून केला. लागलीच या घटनेबाबत माळेगाव पोलिसांना माहिती देण्यात आली होती.

Post a Comment

أحدث أقدم