बारामती दर्पण प्रतिनिधी
मागील वर्षी ज्या तमशाची बिदागी चार लाख रुपये होती त्या मंगला बनसोडेच्या तमाशा मालकांनी तारीख खाली असताना कोऱ्हाळे खुर्द गावाला कार्यक्रम दिला नाही. त्यामुळे गावाची इज्जत घान ठेवणार नाही अन् इथून पुढे मंगला बंसोडेंचा तमाशा कदापी गावात आणणार नाही. या वर्षी अजित दादांनी दबकवल नाहीतर याच स्टेजवर गौतमी पाटीलला अनाल असतं... अन् पुढच्या वर्षी गौतमी पाटीललाच आणणार फक्त कार्यक्रमाचा प्रेक्षकांनी शांत बसून आनंद लुटा अस मत गोरख खोमणे यांनी व्यक्त केलं.
महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात सध्या यात्रा जत्रांचा उत्सव मोठया जल्लोषात सुरू आहे. यात्रेनिमित्त गावात मनोरंजनासाठी तमाशा, ऑर्केस्ट्रा किंवा संगीतबारीचे आयोजन केले जात आहे. मात्र हे सर्व कार्यक्रम पार पाडताना यात्रा कमिटीच्या नाकी नऊ येत आहे. असे असताना कोऱ्हाळे खुर्द गावची यात्रा मात्र गावात आदरयुक्त दरारा असलेले गोरख भाऊ खोमणे यात्रा कमिटीची सर्व कमान स्वतः आपल्या खांद्यावर घेवून गावची यात्रा पार पाडतात.
إرسال تعليق