बारामती दर्पण प्रतिनिधी:
बारामती तालुक्यातील थोपटेवाडी गावच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. सालाबाद प्रमाणे यावर्षीही भैरवनाथ यात्रेनिमित्त गावच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आज बुधवार दिनांक १२ रोजी संध्याकाळी ६ वाजता देवाच्या हळदीचा कार्यक्रम पार पडला. गुरुवार दिनांक १३ रोजी ७ वाजता देवाचे लग्न कार्यक्रम व नंतर रात्री ८ वाजता देवाचा छबिना व भव्य मिरवणूक निघणार आहे.
शुक्रवार दिनांक १४ रोजी रात्री ९ वाजता सर्जेराव जाधव दावडी निमगावकर सह तान्हाजी कोयेकर लोकनाट्य तमाशा होणार आहे.
शनिवार दिनांक १५ रोजी ९ वाजता खास महिलांसाठी मराठी व हिंदी लोकगीतांचा "जल्लोष" हा ऑर्केस्ट्रा होणार आहे. तरी या सर्व कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन गावच्या वतीने भैरवनाथ यात्रा उत्सव कमिटीने केले आहे.
إرسال تعليق