बारामती दर्पण प्रतिनिधी
बारामती:
राज्याचे माजी मंत्री रामदास कदम यांनी केलेल्या वक्तव्याचा बारामती तालुका शहर शिवसेनेच्या वतीने भिगवण चौक या ठिकाणी निषेध करण्यात आला. माजी मंत्री कदम यांच्या प्राप्त प्रतिकात्मक चित्राला जोडे मारून निषेध करण्यात आला. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करीत आपला रोष व्यक्त केला.जोडे मारून आंदोलन करताना पोलिसांनी शिवसैनिकाच्या ताब्यातून  फ्लेक्स घेतला, शिंदे गटातील रामदास कदम यांनी ठाकरे कुटुंबावर केलेल्या आरोपाचा बारामती तालुका शिवसेने च्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत रामदास कदम यांच्या प्रतिमेला पायदळी तुडवले. भिगवन चौक या ठिकाणी शहर व ग्रामीण भागातील शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करीत हा निषेध नोंदवला दरम्यान प्रतिमेला जोडे मारताना शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या यांनी कदम यांच्या विरोधात जोरदार घोषणा बाजी केली.   बारामती शहर पोलिसांनी यावेळी चोक बंदोबस्त ठेवला होता.यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब शिंदे, तालुकाप्रमुख विश्वास मांढरे, शहर प्रमुख पप्पू माने ,जिल्हा समन्वयक भीमराव भोसले ,निलेश मदने, राजेंद्र पिंगळे ,बाळासाहेब गावडे ,सुभाष वाघ ,तालुकाप्रमुख उमेश दुबे, बंटी गायकवाड, संदीप तावरे पाटील ,नितीन गायकवाड, कल्याण जाधव ,कल्पनाताई काटकर ,निखिल देवकाते, युवा सेना तालुकाप्रमुख गणेश करंजे व सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post