बारामती दर्पण प्रतिनिधी
को-हाळे बुद्रुक
कोऱ्हाळे बुद्रुक (ता.बारामती )येथील श्री सिध्देश्वर हायस्कुल व ज्युनि कॉलेज येथे रयत शिक्षण सस्थेचे संस्थापक पद्मभुषन डॉ.कर्मवीर भाउराव पाटील यांच्या 135 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .
यावेळी डॉ.कर्मवीर भाउराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन गावचे सरपंच रवींद्र खोमणे, यांच्या हस्ते करन्यात आले.यावेळी हायस्कुल चे मुख्याध्यापक गावडे एस.एन,स्कुलकमिटी सदस्य नंदकुमार मोरे,राहुल भगत तसेच सर्व शिक्षक व शिक्षिका उपस्तित होते.याप्रसंगी कर्मवीरांच्या प्रतिमेची भव्य मिरवनुक काढन्यात आली या मिरवनुकीमध्ये महाराष्ट्राची लोक धारा अंतर्गत लेझीम पथक ,दाडीया नृत्य ,वारकरी सप्रदाय बॉंड पथकामुळे मिरवणुकीला शोभा आली.
या प्रसंगी ग्रामस्थ विद्यार्थी,शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
Post a Comment