मोरगाव (प्रतिनिधी):
  पुणे जिल्ह्यातील सव्वाचार लाख शेतकऱ्यांनी सातबाऱ्यावर ऑनलाईन ई - पिकपाणी लावण्यासाठी रजीस्टेशन केले असून  बारामती तालुका यामध्ये अग्रक्रमावर असल्याचे प्रतीपादन पुणे उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी केले . ते मोफत डिजीटल सातबारा वाटप प्रसंगी तरडोली ता . बारामती येथे बोलत होते .
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने  बारामती तालुक्यातील तरडोली येथे  उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्या हस्ते  मोफत डिजीटल स्वाक्षरीत सातबारा वाटप करण्यात आले . यावेळी बारामती तालुका तहसीलदार  विजय पाटील , मोरगाव मंडल अधीकारी मुळे , गाव कामगार तलाठी  श्याम झोडगे ,सोमेश्वर सह साखर कारखाना संचालक किसन तांबे ,  जिल्हा परीषद पुणे  स्वच्छता व पाणी पुरवठा समिती निमंत्रित सदस्य हनुमंत भापकर , स्टॅंडींग कमीटी सदस्य मंगेश खताळ ,  संजय भापकर , कोतवाल  संघट्ना  तालुकाध्यक्ष संतोष खोमणे व ग्रामस्थ उपस्थित होते .
विजय पाटील यांच्या हस्ते  डिजिटल स्वाक्षरी सातबाऱ्याचे मोफत वाटप   संजय तेली व तहसिलदार यांच्या हस्ते करण्यात आले .  यावेळी मार्गदर्शन करताना  तेली  त्यांनी सांगितले की , डीजीटल स्वाक्षरी  सातबाऱ्यामुळे शेतकऱ्यांना सातबाऱ्यासाठी तलाठी कार्यालयात घालावे लागणारे हेलपाटे वाचण्यास मदत होणार आहे .तसेच प्रत्येक शेतकऱ्यांने स्वतःच्या शेतातील ई-पिक पाणी स्वतः करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले .उपस्थित कार्यक्रम प्रसंगी  शेतकऱ्यांनी उपजिल्हाधिकारी यांकडे  पाणंद रस्त्यांची मागणी केली . यावेळी तहसीलदार विजय पाटील यांना याबाबत लक्ष पुरवून  तात्काळ पाणंद रस्ते  खुले करण्याच्या सुचना दिल्या .

Post a Comment

Previous Post Next Post