मोरगाव (प्रतिनिधी):
पुणे जिल्ह्यातील सव्वाचार लाख शेतकऱ्यांनी सातबाऱ्यावर ऑनलाईन ई - पिकपाणी लावण्यासाठी रजीस्टेशन केले असून बारामती तालुका यामध्ये अग्रक्रमावर असल्याचे प्रतीपादन पुणे उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी केले . ते मोफत डिजीटल सातबारा वाटप प्रसंगी तरडोली ता . बारामती येथे बोलत होते .
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने बारामती तालुक्यातील तरडोली येथे उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्या हस्ते मोफत डिजीटल स्वाक्षरीत सातबारा वाटप करण्यात आले . यावेळी बारामती तालुका तहसीलदार विजय पाटील , मोरगाव मंडल अधीकारी मुळे , गाव कामगार तलाठी श्याम झोडगे ,सोमेश्वर सह साखर कारखाना संचालक किसन तांबे , जिल्हा परीषद पुणे स्वच्छता व पाणी पुरवठा समिती निमंत्रित सदस्य हनुमंत भापकर , स्टॅंडींग कमीटी सदस्य मंगेश खताळ , संजय भापकर , कोतवाल संघट्ना तालुकाध्यक्ष संतोष खोमणे व ग्रामस्थ उपस्थित होते .
विजय पाटील यांच्या हस्ते डिजिटल स्वाक्षरी सातबाऱ्याचे मोफत वाटप संजय तेली व तहसिलदार यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी मार्गदर्शन करताना तेली त्यांनी सांगितले की , डीजीटल स्वाक्षरी सातबाऱ्यामुळे शेतकऱ्यांना सातबाऱ्यासाठी तलाठी कार्यालयात घालावे लागणारे हेलपाटे वाचण्यास मदत होणार आहे .तसेच प्रत्येक शेतकऱ्यांने स्वतःच्या शेतातील ई-पिक पाणी स्वतः करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले .उपस्थित कार्यक्रम प्रसंगी शेतकऱ्यांनी उपजिल्हाधिकारी यांकडे पाणंद रस्त्यांची मागणी केली . यावेळी तहसीलदार विजय पाटील यांना याबाबत लक्ष पुरवून तात्काळ पाणंद रस्ते खुले करण्याच्या सुचना दिल्या .
إرسال تعليق