बारामती (विशेष प्रतिनिधी-संदिप आढाव)
माळेगाव बुद्रुक, ता. बारामती येथील नगरपंचायत च्या सभागृहामध्ये आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली. अॅड. राहुल तावरे आणि जय मल्हार क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष किरण खोमणे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.
यावेळी बोलताना अॅड. राहुल तावरे म्हणाले की, राजे उमाजी नाईक हे आद्यक्रांतीवीर होते, त्यांचे इतिहासातील योगदान अतिशय मोलाचे आहे. त्यांच्या  आदर्शांचे अनुकरण समाजासाठी अत्यंत उपयोगाचे आहे. त्यांचा आदर्श घेण्याची युवा पिढीला गरज आहे. आज त्यांच्या जयंती निमित्ताने मी त्यांना त्रिवार अभिवादन करतो. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते बंडूनाना पडर आणि चंद्रकांत वाघमोडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. पत्रकार संदिप आढाव यांनी सूत्रसंचालन केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर पाळून हा कार्यक्रम पार पडला. अनिल मदने यांनी उपस्थितांचे आभार मानले. 
यावेळी आरपीआय चे तालूका युवा अध्यक्ष विश्वास भोसले, पत्रकार योगेश भोसले, आसिफ शेख, कुरबान बागवान, संजय चव्हाण, रामचंद्रपप्पू खरात, दत्तामहाराज मदने, मयुर खोमणे, खंडू खोमणे, नजीर बक्षी, संग्राम पवार, सोमनाथ दळवी, सचिन जाधव, विजय काशीद, संजय वाघमारे, नेहाल भोसले, दादा सोनवणे, नगरपंचायत कर्मचारी अनिल निंबाळकर, राजुभाई शेख, शंकर ठोंबरे, विकास जाधव, संदिप शिंदे, रणजित जाधव, कुंडलिक येळे, रेश्मा शेख, शितल चव्हाण इत्यादी उपस्थित होते.
दरम्यान माळेगाव मधील कारखाना रोड ला असलेल्या राजे उमाजी नाईक नगर येथे आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने राजे उमाजीनाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी दिलीप जाधव, कुंडलिक चव्हाण, सचिन जाधव, संदिप खोमणे, गंगाराम चव्हाण, विजय चव्हाण, भोलानाथ जाधव, नितिन चव्हाण इत्यादी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post