पुणे : राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या परीपत्रकानुसार पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक अभीनव देशमुख यांनी दि. ९ रोजी तक्रार निवारण दिन ठेवण्यात आला आहे .यानिमित्ताने पोलीस स्टेशनकडे प्रलंबीत असलेले अर्ज प्रकरणे कामाचा निपटरा केला जाणार आहे .यामध्ये जिल्ह्यात बारामती तालुक्यातील ३ पोलीस स्टेशनसहीत ईतर १६ पोलीस स्टेशनचा समावेश आहे .
कोरोना १९ मुळे पुणे जिल्ह्यातील अनेक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार निवारण दिन ठेवण्यात आला नव्हता . यामुळे पोलीस स्टेशन हद्दीत पुणे पोलीस ग्रामीण अधीक्षक डॉ . अभीनव देशमुख यांनी उद्या गुरुवार दि .९ रोजी हा दिन साजरा करुन प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यास सांगितले आहे .यासाठी संबंधीत अर्जदार , गैरअर्जदार यांनी कागदपत्रासहीत उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे .
उद्या बारामती शहर , बारामती तालुका , वडगांव निंबाळकर ,घोडेगाव , मंचर, आळेफाटा , ओतूर , भिगवण , वालचंदनगर , सासवड , लोणावळा शहर,लोणावळा ग्रामीण , जुन्नर , नारायणगाव , खेड , मंचर , हवेली , दौंड , यवत या ठिकाणी हा दिन साजरा केला केला जाणार आहे .तक्रार निवारण दिनी वरीष्ठ अधीकारी , दुय्यम अधीकारी , पोलीस अंमलदार उपस्थित राहणार आहेत .
Post a Comment