मोरगाव : कोरोना या विषाणूजन्य आजारामुळे राज्यातील अनेक गावांतील ग्रामपंचायतीस ग्रामसभा घेता येत नाही यामुळे बहुतांश विकास कामांना कात्री लागली आहे . विकास कामांबरोबरच गावातील अनेक ग्रामस्थांचे प्रश्न जैसे थे अवस्थेत आहेत . यामुळे आपल्या गावातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी तरडोली ता बारामती येथील सरपंच नवनाथ जगदाळे व उपसरपंच महेंद्र तांबे यांनी नामी शक्कल शोधली आहे . जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी उद्या दि . ८ रोजी कृषी , महसूल , आरोग्य , कर्मचारी व अधीकाऱ्यांचा दरबार बोलवला आहे .
गेल्या दिडवर्षापासुन कोरोना या विषाणूजन्य आजारामुळे बारामती तालुक्याच्या ग्रामीण भागातील गावात ग्रामसभा होत नाहीत . कोरोनामुळे गावातील शेतकऱ्यांसह ,अनेक मजुरवर्ग , विद्य्यार्थ्यांचे पालकांचे गावपातळीवरील अनेक समस्या जैसे थे आहेत . यामुळे बारामती तालुक्यातील तरडोली गावचे सरपंच नवनाथ जगदाळे व उपसरपंच महेंद्र तांबे यांनी कृषी , आरोग्य विभाग , महसूल , प्राथमिक शाळा शिक्षक ,पशु संवर्धन ,महावितरण कंपनी , महीला बालविकास आदी अधीकारी व कर्मचारी बोलावले आहेत .
वरील खात्याअंतर्गत ज्या शेतकऱ्यांची , मजुरवर्गीय व गावात राहत असलेल्या ग्रामस्थांची कामे रखडली आहेत त्यांना विविध वेळेत पाचारण केले आहे . तसेच संबंधीत व्यक्तींनी आपल्या अर्जा मार्फत समक्ष उपस्थित रहावे अथवा व्हॉट्स अप द्वारे अर्ज पाठवावा असे सांगितले आहे . सरपंच ,उपसरपंचांनी जनतेसाठी भरवणार असल्याल्या अधीकाऱ्यांच्या या दरबाराची चर्चा परीसरात चांगलीच रंगली आहे .
Post a Comment