मोरगाव :  कोरोना या विषाणूजन्य आजारामुळे राज्यातील अनेक गावांतील  ग्रामपंचायतीस ग्रामसभा घेता येत नाही यामुळे बहुतांश विकास कामांना कात्री लागली आहे . विकास कामांबरोबरच    गावातील  अनेक ग्रामस्थांचे प्रश्न जैसे थे अवस्थेत आहेत . यामुळे आपल्या गावातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी  तरडोली ता बारामती येथील  सरपंच नवनाथ जगदाळे  व उपसरपंच महेंद्र तांबे यांनी नामी शक्कल शोधली आहे . जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी  उद्या दि . ८ रोजी कृषी , महसूल , आरोग्य , कर्मचारी व  अधीकाऱ्यांचा दरबार बोलवला आहे .


गेल्या दिडवर्षापासुन कोरोना या विषाणूजन्य  आजारामुळे बारामती तालुक्याच्या ग्रामीण भागातील गावात  ग्रामसभा होत नाहीत .  कोरोनामुळे  गावातील शेतकऱ्यांसह  ,अनेक मजुरवर्ग ,  विद्य्यार्थ्यांचे पालकांचे गावपातळीवरील अनेक समस्या जैसे थे आहेत . यामुळे बारामती तालुक्यातील तरडोली गावचे  सरपंच नवनाथ जगदाळे व  उपसरपंच महेंद्र तांबे यांनी कृषी  , आरोग्य विभाग , महसूल , प्राथमिक शाळा शिक्षक ,पशु संवर्धन  ,महावितरण कंपनी , महीला बालविकास  आदी अधीकारी  व कर्मचारी बोलावले  आहेत .


वरील खात्याअंतर्गत ज्या शेतकऱ्यांची , मजुरवर्गीय व गावात राहत असलेल्या ग्रामस्थांची  कामे रखडली आहेत त्यांना  विविध वेळेत  पाचारण केले आहे . तसेच संबंधीत व्यक्तींनी  आपल्या  अर्जा मार्फत समक्ष उपस्थित रहावे अथवा  व्हॉट्स अप द्वारे अर्ज पाठवावा असे सांगितले आहे .  सरपंच ,उपसरपंचांनी जनतेसाठी भरवणार असल्याल्या अधीकाऱ्यांच्या  या दरबाराची चर्चा परीसरात चांगलीच रंगली आहे .

Post a Comment

أحدث أقدم