मोरगाव : बारामती तालुक्याच्या पश्चिम भागातील रासायनिक खतांच्या दुकानात गेल्या महीनाभरापासुन  युरीयाची कमतरता होती . काल बारामती तालुका खरेदी विक्री संघाच्या दुकानात  युरीया आल्यानंतर खरेदीसाठी शेतकऱ्यांनी  रांगा लावल्या होत्या .
मोरगाव येथे गेल्या दोन   महीन्यापासुन  युरीयाची कमतरता आहे . एन खरीपाच्या तोंडावर  युरीयाच्या कमतरतेमुळे शेतकरी चातकाप्रमाणे युरीयाची वाट पाहत होते .आठ दिवसात  मोरगाव येथे  खरेदी विक्री संघाच्या दुकानात  ७०५  बॅग युरीयाची आवक झाली आहे . दि २४ ला आलेला युरीयाची अवघ्या दोन - तीन दिवसात विक्री झाली . तर काल दि २८ रोजी ३६५  बॅग युरीया आल्यानंतर खरेदीसाठी झुंबड लागली होती .
मोरगाव येथील विविध दुकानातुन गेल्या १० दिवसांत  ४० ट्न युरीया विक्री झाली आहे  . खरीप हंगाम  आडसाली उसाची लागण यामुळे   शेतकऱ्यांची  युरीयाची आणखी  मागणी होत आहे . एका शेतकऱ्यांस आधार कार्डच्या आधारे एक गोणी या सम- प्रमाणात वाटप करण्यात येत होते .मागणीच्या मानाने पुरवठा कमी असल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली .

Post a Comment

Previous Post Next Post