मोरगाव : बारामती तालुक्याच्या पश्चिम भागातील रासायनिक खतांच्या दुकानात गेल्या महीनाभरापासुन युरीयाची कमतरता होती . काल बारामती तालुका खरेदी विक्री संघाच्या दुकानात युरीया आल्यानंतर खरेदीसाठी शेतकऱ्यांनी रांगा लावल्या होत्या .
मोरगाव येथे गेल्या दोन महीन्यापासुन युरीयाची कमतरता आहे . एन खरीपाच्या तोंडावर युरीयाच्या कमतरतेमुळे शेतकरी चातकाप्रमाणे युरीयाची वाट पाहत होते .आठ दिवसात मोरगाव येथे खरेदी विक्री संघाच्या दुकानात ७०५ बॅग युरीयाची आवक झाली आहे . दि २४ ला आलेला युरीयाची अवघ्या दोन - तीन दिवसात विक्री झाली . तर काल दि २८ रोजी ३६५ बॅग युरीया आल्यानंतर खरेदीसाठी झुंबड लागली होती .
मोरगाव येथील विविध दुकानातुन गेल्या १० दिवसांत ४० ट्न युरीया विक्री झाली आहे . खरीप हंगाम आडसाली उसाची लागण यामुळे शेतकऱ्यांची युरीयाची आणखी मागणी होत आहे . एका शेतकऱ्यांस आधार कार्डच्या आधारे एक गोणी या सम- प्रमाणात वाटप करण्यात येत होते .मागणीच्या मानाने पुरवठा कमी असल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली .
إرسال تعليق