बारामती दर्पण टीम
श्रीगोंदा (प्रतिनिधी- रोहन रंधवे)
वंचित ओबीसी समाजाला त्यांचे न्याय, हक्क मिळवून देण्याच्या उद्देशाने- बारा बलुतेदार महासंघाचे धोरण ठरविण्यासाठी प्रजा लोकशाही परिषद, महाराष्ट्र राज्य तसेच बारा बलुतेदार महासंघ, महाराष्ट्र राज्य च्या वतीने संपुर्ण राज्यभर ठिकठिकाणी चिंतन बैठकीचा उपक्रम राबविण्यात येणार असून त्याची सुरुवात अहमदनगरपासून करण्यात आली, राज्यातील प्रस्थापित नेत्यांनी ओबीसींच्या सवलतीचा लाभ फक्त आपल्या समाजाला करून दिल्यामुळे मायक्रो ओबीसींच्या 330 जाती, बारा बलुतेदार-अलुतेदार आणि भटक्या विमुक्तांवर घोर अन्याय झालेला आहे. आता पुन्हा मराठा आरक्षण आंदोलनामुळे जर मराठा समाजाचा ओबीसी मध्ये सामावेश करण्यात आला तर मायक्रो ओबीसी इतिहास जमा होतील. म्हणून केंद्र आणि राज्य सरकारने मराठा समाजासाठी आर्थिक उन्नतीसाठीच विचार करावा असे प्रजा लोकशाही परिषद, महाराष्ट्र राज्य आणि बारा बलुतेदार महासंघ, महाराष्ट्र राज्य चे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव दळे यांनी या बैठकीमध्ये सांगितले.
ओबीसींच्या नावावर मोठे झालेले राजकीय पक्षात स्थान मिळवून फक्त आपल्या समाजाला ओबीसी आरक्षणाचा फायदा मिळवून देत आहेत. हा अन्याय मायक्रो ओबीसी आता सहन करणार नाही. मायक्रो ओबीसींच्या 330 जाती, बारा बलुतेदार, अलुतेदार, आणि भटक्या विमुक्त या सर्वांना एकत्रित करून या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी, समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्रातील सहा विभागात सहा चिंतन बैठका घेऊन त्यापुढे राज्यस्तरीय मोठी बैठक घेतल्यानंतर पुढील दिशा ठरविण्यात येईल. सध्या महाराष्ट्रात होत असलेल आंदोलन हे नौटंकी आंदोलन असुन वंचित ओबीसींच्या न्याय हक्कांसाठी प्रजा लोकशाही परिषद व बारा बलुतेदार महासंघ च्या वतीने तीव्र लढा उभारणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या बैठकीची सुरुवात बारा बलुतेदार महासंघाचे युवा प्रदेशाध्यक्ष विशाल भाई जाधव यांनी भारताचे संविधान वाचून केली, सूत्रसंचालन बारा बलुतेदार महासंघाच्या अहमदनगर शहर अध्यक्षा अनुरिता झगडे यांनी केले तर दामोदर बिडवे यांनी आभार मानले. या बैठकीला शब्बीर अन्सारी, संदेश चव्हाण, प्रतापराव गुरव, सतिशराव कसबे, चंद्रकांत गवळी, माऊलीमामा गायकवाड, दशरथआबा राऊत, डी डी सोनटक्के, अनिल शिंदे, किसनराव जोर्वेकर, राजेश मुके, सुधाकर पवार, शशिकांत दळवी, साहेबराव कुमावत, दत्तात्रय चेचर, अशोकराव सोनवणे, सदाशिव हिवलेकर, सतिश दरेकर, महेश निनाळे, डॉ. पी बी कुंभार, मोहन जगदाळे, मच्छीन्द्र भोसले, प्रा. पोपळघट, शशिकांत आमने, लक्ष्मण वडले, दादासाहेब तापकर, सुनिल काळे, विजय पोहनकर, अविनाश चव्हाण, पी टी चव्हाण, चंद्रकांत शेंडे, अजय रंधवे, विजय क्षीरसागर, अनिल इवळे, आर्यन गिरमे, शरद शिंदे, इंद्रजित कुटे, शाम आवटे, गणेश शिंदे, संदीप आढाव, धनंजय शिंगाडे,मनिषा गुरव, छाया नवले इत्यादी उपस्थित होते.
Post a Comment