इंदापूर (विशेष प्रतिनिधी- संदिप आढाव)
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी प्रवर्गासाठी असलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने तात्काळ ओबीसी जनगणना डाटा सादर करावा व आरक्षण पूर्ववत लागू होणेकामी कार्यवाही व्हावी या प्रमुख मागणीसह ओबीसींच्या इतर मागण्या शासन दरबारी पोहचाव्यात याकरिता राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाच्या वतीने इंदापूर येथील तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. तसेच ओबीसींच्या मागण्यांचे निवेदन इंदापूर चे तहसीलदार अनिल ठोंबरे यांना देण्यात आले. ओबीसींच्या मागण्यांबाबत शासनाने दिरंगाई केल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल असे बारा बलुतेदार संघटनेचे नेते व इंदापूर तालुका परीट धोबी समाज संघटनेचे अध्यक्ष हनुमंत घोडके यांनी सांगितले. यावेळी सोपानराव कारंडे, नवनाथ भोसले, युवराज लोंढे, बंडा गायकवाड, मच्छीन्द्र शिंदे, नवनाथ राऊत इत्यादी उपस्थित होते.
Post a Comment