मोरगाव : मोरगाव ता बारामती येथील मयुरेश्वर आय.सी.यु.हॉस्पिटल या कोवीड केंद्रामध्ये केवळ पाच तास पुरेल एवढा ऑक्सीजन शिल्लक आहे . येथील रुग्णांच्या नातेवाईकांना पुर्व सुचना देऊन रुग्णांस ईतर ठिकाणच्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सीजन बेड पहायला रुग्णालय व्यवस्थापनाकडून सांगितले आहे. यामुळे नातेवाईकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे .
येथील मयुरेश्वर हॉस्पिटल कोवीड केंद्रामध्ये ४२ रुग्ण कोरोना उपचार घेत आहेत. पैकी १२ रुग्ण ऑक्सीजनवर आहेत . हॉस्पिटलला उपलब्ध ऑक्सीजन केवळ चार ते पाच तास टीकेल एवढाच शिल्लक असल्याची माहीती हॉस्पिटलचे डॉक्टर पवार यांनी सांगितले . ऑक्सीजन उपलब्ध करुन मिळणेबाबत बारामती प्रांताधीकारी दादासाहेब कांबळे यांच्याशी हॉस्पिटल व्यवस्थापनाने संपर्क साधला आहे .
मोरगाव येथील वेल्डींग व्यवसाय करणाऱ्या व्यवसाईकांस ऑक्सीजन सिलेंडर शिल्लक असल्यास मदत करण्याचे आवाहन हॉस्पिटलकडून करण्यात येत आहे. ऑक्सीजन मिळण्यासाठी शासन व खाजगी पातळीवर या कोवीड सेंटरकडुन प्रयत्न सुरु केले आहेत . मात्र कोठेही ऑक्सीजन उपलब्ध न झाल्यास रुग्णांना ईतर ठिकाणी अधीक उपचारासाठी हलवावे अशी पूर्वसूचना दिली असल्याने नातेवाईक व रुग्ण धास्तावले आहेत.
Post a Comment