इंदापूर (प्रतिनिधी-संदिप आढाव)
देव दगडात नाही रे... माणसात आहे. असा मंत्र देऊन अज्ञान, अस्वच्छता, अंधश्रद्धा यांनी बुरसटलेल्या समाजाचा विकास करण्याचे व्रत हाती घेऊन किर्तना सारखे प्रभावी माध्यम वापरून समाज सुधारण्याचे कार्य करणारे संत गाडगेबाबा महाराज यांची जयंती भिगवण, ता. इंदापूर येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये साजरी करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत भिगवण चे सरपंच तानाजी वायसे आणि महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळ लॉंड्री संघटनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष व भिगवण समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत कदम यांच्या हस्ते गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच परीट समाजाचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्र धोबी परीट समाज आरक्षण समन्वय समितीचे प्रमुख रमाकांतशेठ कदम ज्यांनी की, धोबी समाजाच्या सर्व संघटनांना व समाजाला एकत्र करून सरकारने समाजाचे हिरावून घेतलेले हक्काचे एस सी चे आरक्षण समाजाला पुन्हा मिळवून देणेचा वसा हाती घेतला होता अशा समाजनेत्याचे गाडगेबाबा यांच्या जयंतीदिनाच्या पूर्वसंध्येला दुःखद निधन झाले आणि राज्यातील संपूर्ण धोबी समाजबांधवांवर दुःखाचा डोंगर कोसळला. भिगवण येथील राष्ट्रसंत गाडगेबाबा समाज मंदिरामध्ये धोबी समाज बांधव आणि भिगवण ग्रामस्थांनी एकत्र येत कै. रमाकांतशेठ कदम यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी पंचायत समिती इंदापूर चे उपसभापती संजय दिहाडे, इंदापूर मार्केट कमिटीचे माजी सदस्य पराग जाधव, इंदापूर बँकेचे माजी चेअरमन अशोक शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे इंदापूर तालुका सरचिटणीस मनोज राक्षे, ग्रामपंचायत भिगवण चे सदस्य जयदीप जाधव, हरिश्चंद्र पांढरे, जावेद शेख, समाजसेवक मंगेश कदम, गणेश राक्षे, महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळ चे पुणे जिल्हा युवा उपाध्यक्ष राहुल कदम, इंदापूर तालुका युवा अध्यक्ष निलेश गायकवाड, सुदाम गायकवाड, वेदांत कदम, ओंकार शेलार इत्यादी उपस्थित होते..
إرسال تعليق