माळेगाव प्रतिनिधी: (दि:४)
बारामतीच्या ग्रामीण भागात चोरीचे प्रमाण वाढले असून परिसरात संशयास्पद व्यक्ती आढळून आल्यास कायदा हातात न घेता पोलिसांना कळवा असे आवाहन पणदरे पोलिसांनी केले आहे.
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या सूचनेनुसार पणदरे पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या 13 गावच्या पोलीस पाटलांची मीटिंग पणदरे पोलीस स्टेशन येथे पार पडली. यावेळी पोलिसांनी हे आवाहन केले.
पणदरे नजीक सोनकसवाडी याठिकाणी चोरीची घटना घडल्यानंतर आसपासच्या गावात अनेक ठिकाणी गावागावात युवक गस्त घालून पोलिसांना मदत करत आहेत. मात्र अनेक ठिकाणी अफवा पसरवल्या जात असल्याचे निदर्शनास येत आहे. अफवा न पसरवता संशयास्पद व्यक्ती आढळून आल्यास त्याला हानमार न करता पोलिसांच्या ताब्यात द्या संबंधित व्यक्तीची संपूर्ण चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन यावेळी पोलिसांनी दिले. पोलीस स्टेशनची गाडी रात्री सर्व गावात राउंडला फिरत असते मात्र सर्व गावात एका वेळी पोहोचू शकत नाही त्यामुळे पोलिस पाटलांनी सतर्क राहून काम करावे तसेच गावातील सर्व दुकानदारांनी दुकानासमोर सीसीटीव्ही कॅमेरे बसून पोलिसांनाही सहकार्य करावे असेही यावेळी सांगण्यात आले. यावेळी पणदरे पोलीस स्टेशनचे पोलीस हवलदार पन्हाळे, खेडकर, खोमणे, पत्रकार सचिन वाघ यांच्यासह पोलीस पाटील उपस्थित होते.
إرسال تعليق