मोरगांव :  संकष्टी चतुर्थीला होणारी गर्दी व कोरोनाचा वाढवा फैलाव लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून आज दि ३१ रोजी अष्टविनायक तिर्थक्षेत्र  मोरगांव ता बारामती येथील  मयुरेश्वर मंदिर   बंद ठेवले होते . प्रशासनाच्या सुचनेनुसार आज सर्व भावीकांना  श्रींच्या दर्शनासाठी  मंदिर बंद नेहमी  गजबजलेल्या मोरगावात शुकशुकाट जाणवत होता .
आज संकष्टी निमित्ताने  पहाटे गुरव मंडळी तर  दुपारी ७ वाजता सालकरी ढेरे यांची पुजा झाली . बारामती प्रांताधीकारी दादासाहेब कांबळे यांनी चतुर्थीला  मंदिर बंद ठेवण्याचा आदेश काढला होता. यानुसार आदेशाचे पालन करून मंदिर बंद ठेवले होते . परीसरातील भावीकांची होणारी संभाव्यगर्दी लक्षात घेता  आदेशानुसार चिंचवड देवस्थानच्या सुरक्षारक्षकांनी  दगडी फरस व येण्याचे मार्ग लोखंडी बॅरीकेट लावून  बंद ठेवले होते .
दुपारी श्रींची देवस्थान मार्फत पुजा झाली . दिवसभारात केवळ एखादा दुसरा भावीक पायरी व कळस दर्शन घेऊन जाताना आढळत होता . सायंकाळी ७ नंतर परीसरातील भक्तांची मंदीयाळी जाणवत होती . भावीकांच्या शुकशुकाटमुळे  येथील दुकानदारांचे आतोनात नुकसान झाले .  
व्यवसाईकांकडून कोरोनाचे संकट जाण्यासाठी मयुरेश्वराला साकडे घातले जात होते . रात्री चंद्रोदयाच्यावेळी नेहमीप्रमाणे  निवडक गुरव मंडळींच्या पस्थितीत आरती झाली . यानंतर  श्रींस महानैवेद्य दाखविण्यात आला .तर गणेश भक्तांना उद्या दि १ रोजी नेहमीप्रमाणे दर्शनासाठी मंदिर खुले राहणार आहे .
 

Post a Comment

Previous Post Next Post