मोरगांव : संकष्टी चतुर्थीला होणारी गर्दी व कोरोनाचा वाढवा फैलाव लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून आज दि ३१ रोजी अष्टविनायक तिर्थक्षेत्र मोरगांव ता बारामती येथील मयुरेश्वर मंदिर बंद ठेवले होते . प्रशासनाच्या सुचनेनुसार आज सर्व भावीकांना श्रींच्या दर्शनासाठी मंदिर बंद नेहमी गजबजलेल्या मोरगावात शुकशुकाट जाणवत होता .
आज संकष्टी निमित्ताने पहाटे गुरव मंडळी तर दुपारी ७ वाजता सालकरी ढेरे यांची पुजा झाली . बारामती प्रांताधीकारी दादासाहेब कांबळे यांनी चतुर्थीला मंदिर बंद ठेवण्याचा आदेश काढला होता. यानुसार आदेशाचे पालन करून मंदिर बंद ठेवले होते . परीसरातील भावीकांची होणारी संभाव्यगर्दी लक्षात घेता आदेशानुसार चिंचवड देवस्थानच्या सुरक्षारक्षकांनी दगडी फरस व येण्याचे मार्ग लोखंडी बॅरीकेट लावून बंद ठेवले होते .
दुपारी श्रींची देवस्थान मार्फत पुजा झाली . दिवसभारात केवळ एखादा दुसरा भावीक पायरी व कळस दर्शन घेऊन जाताना आढळत होता . सायंकाळी ७ नंतर परीसरातील भक्तांची मंदीयाळी जाणवत होती . भावीकांच्या शुकशुकाटमुळे येथील दुकानदारांचे आतोनात नुकसान झाले .
व्यवसाईकांकडून कोरोनाचे संकट जाण्यासाठी मयुरेश्वराला साकडे घातले जात होते . रात्री चंद्रोदयाच्यावेळी नेहमीप्रमाणे निवडक गुरव मंडळींच्या पस्थितीत आरती झाली . यानंतर श्रींस महानैवेद्य दाखविण्यात आला .तर गणेश भक्तांना उद्या दि १ रोजी नेहमीप्रमाणे दर्शनासाठी मंदिर खुले राहणार आहे .
إرسال تعليق