कोऱ्हाळे बुद्रुक (दि१८):
बारामती तालुक्यातील थोपटेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश खोमणे यांच्या पॅनल चा दारुण पराभव करण्यात भैरवनाथ ग्रामविकास पॅनल ला यश आले असून भैरवनाथ ग्राम विकास पॅनलचे नऊ पैकी आठ उमेदवार विजयी झाले आहेत. दहा वर्षाची सत्ता उलथून टाकण्या साठी गावातील युवक ,ज्येष्ठ नागरिक ,महिला ,मजूर वर्गाने कंबर कसली होती. सत्ताधाऱ्यांना दहा वर्षात गावच्या पाण्याचा प्रश्नही सोडवता आला नसल्याने मतदारांनी त्यांना स्पष्ट नाकारले आहे. अटीतटीच्या या लढतीत संपूर्ण तालुक्याचे लक्ष थोपटेवाडी ग्रामपंचायतीकडे लागले होते. दुपारी निकाल हाती येताच थोपटेवडी गावात घराघरात जल्लोष साजरा करण्यात आला. आज पासूनच्या गावच्या विकासाला भैरवनाथ ग्राम विकास पॅनल बांधील असेल असे सचिन वाघ यांनी यावेळी सांगितले.
Post a Comment