को-हाळे बुद्रुक -(दि१३) थोपटेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत भैरवनाथ ग्राम विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करून थोपटेवाडी गावची सत्ता युवकांच्या हाती द्या असे मत सचिन वाघ यांनी व्यक्त केले. भैरवनाथ ग्राम विकास पॅनलच्या सांगता सभेत ते बोलत होते. सत्ताधाऱ्यांनी दहा वर्षात विकासाच्या बाबतीत गाव वेठीस धरले असून चोरांच्या हातात सत्ता न देता पोरांच्या हातात सत्ता देण्याची हीच अचूक वेळ असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी डॉक्टर युवराज नलवडे यांनीही विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. पृथ्वीराज नलवडे यांनी ग्रामपंचायती मध्ये पाच वर्षात झालेल्या भोंगळ कारभाराचा पाढा वाचला. माजी सदस्य हरिभाऊ थोपटे यांनी ही गावचा विकास करायचा असेल तर युवकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून मतदाना रुपी युवकांना आशीर्वाद देण्याचे आव्हान केले. यावेळी मोठ्या संख्येने गावातील महिला, युवक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिक संघटनाही युवकांच्या पाठीशी असल्याचे सोमेश्वर कारखान्याचे माजी कामगार अध्यक्ष नारायणराव नलवडे यांनी सांगितले. सूत्रसंचालन व आभार सुधीर यादव यांनी व्यक्त केले.
थोपटेवाडी गावची सत्ता युवकांच्या हाती द्या- सचिन वाघ l सा.बारामती दर्पण
baramati darpan
0
Comments
Post a Comment