मोरगाव:(दि५) बारामती तालुका मराठी पञकार संघाची बैठक मोरगाव येथील शासकीय विश्रामगृहात संपन्न झाली.यावेळी शेरेवाडी ( ता.बारामती) सुपुञ ,जिजामाता विद्यालयाचे आदर्श शिक्षक ,दै.संध्याचे पञकार मा.प्रल्हाद गिरमे सर यांची पुरंदर तालुका काँग्रेस शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बारामती तालुका मराठी पञकार संघच्या वतीने ज्येष्ठ पञकार मा.अशोक वेदपाठक यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी पुणे जिल्हा पञकार संघाचे मा.अध्यक्ष सुनील लोणकर ,पुणे जिल्हा पञकार संघ कोषाध्यक्ष मनोहर तावरे ,बारामती तालुका मराठी पञकार संघ अध्यक्ष हेमंत गडकरी ,बारामती तालुका मराठी पञकार संघ कार्यकारीणी सदस्य सर्वश्री , विकास कोकरे, सुरज देवकाते,चंद्रकांत साळुंके,
प्रशांत धुमाळ,प्रेस फोटोग्राफर संतोष चौधरी समिर गायकवाड,आसिफ शेख, दत्तात्रेय निंबाळकर व सिकंदर शेख उपस्थित होते .
मा,प्रल्हाद गिरमे सर यांनी शून्यातून प्रगती साधत जीवनात उज्वल यश संपादन केले.पञकारीता,शैक्षणिक व सामाजिक सेवेच्या माध्यमातून अनेकांना न्याय मिळवून दिला.अनेक विद्यार्थी घडविले.त्यांच्यातील कर्तृत्व व नेतृत्वगुणाची चमक पाहून वरिष्ठांनी त्यांची पुरंदर तालुका काँग्रेस शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी निवड केली.कर्मभूमी पुरंदर असलेल्या प्रल्हाद गिरमे यांचा जन्मभूमी बारामती येथे झालेला सत्कार अनमोल असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
Post a Comment