सोमेश्वर नगर - प्रतिनिधी
महावितरणच्या चुकीमुळे उसाच्या पक्व झालेल्या पिकाला आग लागून दीड एकरातील ऊस खाक झाला असून यामध्ये शेतकऱ्याचे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
बारामती तालुक्यातील होळ या ठिकाणची ही घटना आहे. शेतकरी नंदकुमार जाधव यांचे श्रीकृष्ण मंदिराजवळ शेत आहे. त्यांच्या शेतातील ऊस या पिकाला महावितरणच्या तारा मुळे आग लागली. आसपासच्या शेतकऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र जास्त वारा असल्याने आग विजवता आली नाही. त्यामुळे उसाचे पक्व झालेले पीक पूर्णपणे जळून गेले. या घटनेत शेतकरी नंदकुमार जाधव यांचे जवळपास तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती त्यांनी महावितरण व गाव कामगार तलाठी यांना दिली आहे. मात्र सध्या साखर कारखाने बंद असल्याने त्यांचा ऊस गाळपास नेता आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
Post a Comment