बारामती दर्पण प्रतिनिधी
 मोरगाव :
   
         मोरगाव- जेजुरी ता. पुरंदर नजीक इंडियन सिमलेस येथे असलेल्या श्रीराम हॉटेल जवळ झालेल्या अपघातात आठ लोकांचा जागीच मृत्यू झाला आहे. हॉटेल साठी आणलेले साहित्य व फ्रिज सायंकाळी साडेसातच्या दरम्यान खाली होत होते याच दरम्यान स्वीफ्ट गाडीने जोरदार ठोस दिल्याने हा भीषण अपघात झाला.
     या अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये सोमनाथ रामचद्र वायसे, रामु संजीवन ( दोघे रा.नाझरे कप ता. पुरंदर) अजय कुमार चव्हाण (रा. उत्तरप्रदेश) अजित अशोक जाधव (रा. कांजळे, ता. भोर) किरण भारत राऊत (रा. पवारवाडी, ता. इंदापूर) अक्षय शंकर राऊत (रा. झारगडवाडी, ता.इंदापूर) अश्विनी शंकर ऐसार (रा.नागनसूर हेद्रे सोलापूर) यांचा समावेश आहे तर एका मृताची अजूनही ओळख पटू शकली नाही. या अपघातामध्ये दोन मुलांसह पाचजणही जखमी झाले आहेत       
    मोरगाव - जेजुरी या रस्त्यावर इंडियन सिमलेस नजीक हॉटेल श्रीराम आहे.या हॉटेल साठी आणलेल्या फ्रिज खाली करण्यासाठी हॉटेल च्या मुख्य द्वाराच्या बाजूला रिव्हर्सने पिकअप गाडी क्रमांक एम एच 12 एक्स एम 36 94 लावली होती. याच दरम्यान भरधाव स्वीफ्ट गाडी क्रमांक एम एच 42 ए एक्स 1060 जेजुरी वरून मोरगावच्या दिशेने आली असता तिने जोरदार धडक दिली. यामध्ये आठ लोक मृत्यु झाला आहे. स्विफ्ट ने जोरदार ठोस दिल्याने पिकप पलटी झाल्याने पिकपच्या शेजारी उभी राहिलेली काही लोक पिकप खाली आल्याने मृत्युमुखी पडल्याची संख्या 8 झाली आहे. यामध्ये स्विफ्ट गाडीतील महिला, लहान मुलं , असून या हॉटेलचा मालक वायसे यांचा सुद्धा या अपघातात मृत्यू झाला  आहे.

Post a Comment

Previous Post Next Post