.
बारामती(दि४) बारामतीत काल दिवसभरात 57 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तसेच आतापर्यंत बारामतीत 2776 कोरोना ग्रस्तांनी कोरोनावर मात केली आहे. अशी माहिती तालुका आरोग्याधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली आहे.
काल शासकीय (03/10/20) एकूण rt-pcr नमुने 278 घेण्यात आले होते यापैकी एकूण पॉझिटिव्ह 34 तर प्रतीक्षेत 111 आहेत. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00 आहेत.कालचे एकूण एंटीजन 90 नमुणे घेण्यात आले होते. यापैकी एकूण पॉझिटिव्ह 23 आले आहेत.काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 34+23=57 झाले आहेत यामध्ये शहरातील 21 तर ग्रामीण भागातील 36 रुग्ण आहेत. आत्तापर्यंत बारामतीची एकूण रूग्णसंख्या 3458 झाली असून एकूण बरे झालेले रुग्ण 2776 झाले आहेत.तसेच एकूण मृत्यू 88 झाले आहेत.

Post a Comment