.
बारामती(दि२) बारामतीत काल दिवसभरात 41 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी या उपक्रमांतर्गत पिंपंळी या गावात 8 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह अढळून आले आहेत.त्यामुळे काल दिवसभराची रुग्णसंख्या 49 झाली  आहे. अशी माहिती तालुका आरोग्याधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली आहे. 
     काल शासकीय (01/10/20)एकूण rt-pcr 167 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते यापैकी एकूण पॉझिटिव्ह 18 तर प्रतीक्षेत 00 आहेत. तसेच इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण 01आहे. काल खाजगी प्रयोगशाळेमध्ये  एकूण rt-pcr  20 नमुने तपासले असता त्यापैकी पॉझिटिव्ह 06 आले आहेत.  तसेच  काल एकूण एंटीजन 81नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते यापैकी एकूण पॉझिटिव्ह 17 आले आहेत.      त्यामुळे काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 18+06+17=41 झाली आहे.यामध्ये शहरातील 18 तर ग्रामीण भागातील 23 रुग्ण आहेत. तसेच एकूण मृत्यू 85 झाले आहेत.                    तसेच "काल माझे कुटुंब माझी जबाबदारी" या उपक्रमांतर्गत पिंपळी याठिकाणी ऍक्टिव्ह सर्वे करण्यात आला त्यामध्ये एकूण 46 संशयितांपैकी 38 जणांची अॅन्टीजेन टेस्ट करण्यात आली  त्यामध्ये 08  रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत त्यामुळे बारामतीची रुग्ण संख्या 3334 झालेली आहे. एकूण बरे झालेले रुग्ण 2582 झाले आहेत.  

Post a Comment

Previous Post Next Post