बारामती - हेमंत गडकरी
      बारामती(दि१): शरयु फौंडेशनच्या अध्यक्षा सौ. शर्मिला पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शरयु फौंडेशनच्या वतीने बारामती एमआयडीसी येथे काम करीत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना मोफत एक हजार मास्क व सनीटायझरचे वाटप आणि मेडिकल कॉलेज येथील डॉक्टर व नर्स  यांना मेडिकल किटचे वाटप करण्यात आले. त्यावेळी महिला कर्मचारी व डॉक्टर, नर्स यांनी शर्मिला पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन समाधान व्यक्त केले यावेळी सर्व डॉक्टर स्टाफला  विठ्ठल मूर्ती व टिफीन बॉक्स व कोविडं योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले आमच्या या कामासाठी कोणीच सन्मान व शाबासकी दिली नव्हती ती शरयु फौंडेशन मित्र परिवाराने  आम्हाला दिली असे श्री डॉ. तांबे यांनी भाषणात  सांगून  शरयु फौंडेशनचे आभार मानले यावेळी
अनिल मोहिते.रोहित काटे. विक्रम निबांळकर .शुभम निंबाळकर.हसन तांबोळी.आबा टकले.अभय काटे.गौरव जाधव.अमोल पवार.जयदीप बुरूंगले.दत्ता माने.सोमनाथ गायकवाड.स्वप्निल जगताप, पार्थ निंबाळकर, चंदू लोंढे, अक्षय परकाळे ,अभिजित घाडगे ,अविनाश बांदल ,अजिंक्य जगताप ,
राजेंद्र बापू निंबाळकर ,सुभाष शिंदे ,डी एन जगताप, अनिल काटे, महादेव कचरे ,सुधीर पानसरे ,रोहित काटे ,आबा टकले ,हसन तांबोळी ,विलास घुले, या मित्र परिवाराने उपस्थित राहून मास्क व सॅनिटायझर किटचे वाटप करून वाढदिवस साजरा केला.

Post a Comment

Previous Post Next Post