माळेगाव - प्रतिनिधी(दि१४)
बारामती तालुक्यात कोरोनाचा प्रसार वेगात सुरू आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी बारामती शहर व तालुका बंद ठेवण्यात आलाय मात्र तरीही कोरोनाचा कहर कमी होत नव्हता. यासाठी कोरोनाचे हॉटस्पॉट ठरेलेल्या माळेगाव, पणदरे व गुनवडी गावातील सर्व लोकांची स्क्रिनिंग करण्यात आले मात्र या कार्यक्रमाचा पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र आहे.
     सुरुवातीला सर्व कर्मचारी वेळेत येवून ही त्यांना उशिरापर्यंत साहित्य देण्यात आले नव्हते. साहित्य देताना कोणत्याही प्रकारचे सोशल डीस्टसिंग मशीन दिल्यानंतर दहाच मिनिटात अनेकांचे सदोष ऑक्सिमिटर बंद पडले. त्यानंतर दिलेले दुसरे ऑक्सिमीटर ही दोषपूर्ण च होते. त्यामळे कर्मचाऱ्यांना नाहक मनस्ताप झाला. अनेक ऑक्सिमीटर मध्ये सातत्याने चुकीचे रीडिंग येत होते. अनेक थर्मल गन ही बंद पडल्या होत्या. एकाच व्यक्तीच्या वेगवेगळ्या नोंदी येत होत्या. त्यामुळे झालेला सर्व्हे अचूक झाला का हा प्रश्न उपस्थित होतो. याशिवाय अनेक लोक सर्व्हे असताना देखील घराबाहेर पडले होते त्यांचा सर्व्हे राहून गेला आहे.
      या कामासाठी शिक्षक नियुक्त करण्यात आले होते. हे शिक्षक सकाळी सातला उपस्थित होते. त्यांना घरी जाण्यासाठी सायंकाळी उशीर झाला. त्या सर्व शिक्षकांची उपासमार झाली. त्यामुळे हे सर्व शिक्षक त्रस्त झाले होते. 
 खराब मशीन मुळे हा झालेला सर्व्हे योग्य झाला असेल का असा ही प्रश्न उपस्थित होतोय...

Post a Comment

Previous Post Next Post