बारामती(दि१४) बारामतीमध्ये कोरोना रुग्ण संख्या सध्या कमी होत असल्याचे दिसून येत आहे. आज बारामतीमध्ये 58 रूग्णांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.मागील आठ दहा दिवसांपूर्वी बारामतीमध्ये शंभराच्या पटीत रुग्ण सापडत होते.त्यामुळे प्रशासनाने बारामतीमध्ये जनता कर्फ्यू लागू केला होता याचा परिणाम सध्या पहायला मिळत असून रुग्णांची संख्या सध्या कमी होताना दिसत आहे . त्यामुळे प्रशासनाने सात दिवसांचा जनता कर्फ्यू काल चौदा दिवसांवर वाढवला आहे.
बारामती मधील कालचे (13/09/20) एकूण rt-pcr नमुने 235 घेण्यात आले होते. त्यापैकी पॉझिटिव्ह- 27 व प्रतीक्षेत 07 आहेत व इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 00 आहे. तसेच कालचे एकूण एंटीजन 79 नमुने तपासणीसाठी घेतले होते . यापैकी एकूण पॉझिटिव्ह 31 आले आहेत .काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 27 + 31=58 असून यामध्ये शहरातील 23 व ग्रामीण भागातील 35 जण आहेत. बारामतीची एकूण रूग्णसंख्या-2113 झाली असून एकूण बरे झालेले रुग्ण 1013 आहेत. तर एकूण मृत्यूंची संख्या 56 झाली आहे. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली आहे .
Post a Comment