कोऱ्हाळे बु - जनता कर्फ्यू काळात वडगाव पोलिसांनी ग्रामीण भागात कडक कारवाईला सुरुवात केली आहे.चारपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र आल्यास गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे.काल सुपे येथे सहा जणांवर गुन्हे दाखल केल्यानंतर आज को-हाळे बुद्रुक येथिल पाच व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशऩ महाराष्ट्र पोलिस कायदा 1951 चे कलम 37(1)व (3)प्रमाणे 1) अहमद सुलेमान शेख वय 32 वर्षे 2) अजीम निजाम शेख लय 35 3) निहाल सुलतान शेख वय 32  4) सादीक नजीर शेख वय 30वर्षे 5) आनंदा तुकाराम खोमणे वय 35 वर्षे सर्व रा को-हाळे बु ता बारामती जि पुणे  यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  आज सकाळी 11.45 वा.सुमा.मौजे  को-हाळे बु गावचे हद्दीत ता.बारामती जि.पुणे हकिकत-वर नमुद केले ता.वेळी व ठिकाणी यातील नमुद आरोपी यांनी  मा.जिल्हाधिकारी सो. पुणे यांचे वरील आदेशाचे उल्लंघन करुन एकत्रीत बसलेले मिळुन आले  वगैरे मजकुरचे फिर्यादी वरुन गुन्हा दाखल करुन गुन्ह्याचा प्रथमवर्दि रिपोर्ट मा.JMFC कोर्ट बारामती यांना रवाना करण्यात आला असुन पुढील तपास पो हवा पाटमास हे करीत आहेत.


Post a Comment

Previous Post Next Post